Anuradha Vipat
घरातील शिल्लक राहिलेले अन्न पुन्हा गरम करून खाण्याची सवय अनेकांना असते.
काही अन्नपदार्थ पुन्हा गरम केल्यास त्यातील पोषक घटक नष्ट होतात आणि ते विषारी बनतात.
शिजवलेले बटाटे जास्त वेळ खोलीच्या तापमानात ठेवल्यास त्यात 'क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम' नावाचे बॅक्टेरिया वेगाने वाढतात.
पालक पुन्हा गरम केल्यास या नायट्रेट्सचे रूपांतर अतिशय घातक अशा 'नायट्रोसामाइन' आणि 'नायट्राइट्स' मध्ये होते, जे शरीरासाठी कर्करोगजन्य ठरू शकते
भात पुन्हा गरम केल्यावर हे जिवाणू दुप्पट वेगाने वाढतात, ज्यामुळे उलटी, जुलाब आणि गॅस्ट्रोचा त्रास होऊ शकतो .
उकडलेली अंडी किंवा अंड्याची भुर्जी पुन्हा गरम केल्यास प्रथिनांची रचना बदलते. यामुळे पचनसंस्था बिघडून तीव्र पोटदुखी होऊ शकते.
फ्रिजमध्ये ठेवलेले चिकन पुन्हा हाय-हीटवर गरम केल्यास त्यातील प्रोटीन कंपोझिशन बदलून अपचन आणि गॅसचा त्रास वाढतो.