Mahesh Gaikwad
अंडी हा प्रोटीनचा सर्वोत्तम स्त्रोत असला तरी त्याचे काही पदार्थांसोबत सेवन केल्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
अंडी पचायला जड असतात, अशावेळी काही पदार्थ असे आहेत, जे अंड्यासोबत किंवा नंतर खाल्याने पचन, अॅसिडिटी किंवा फूड पॉईझन सारख्या समस्या होवू शकतात.
अंडी आणि दुधामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. हे दोन्ही एकत्र खाल्ल्यास पचनसंस्थेवर भार येतो. यामुळे गॅस, मळमळ, किंवा त्वचारोग होण्याची शक्यता असते.
कलिंगड हे थंड प्रकृतीचे फळ आहे. अंडी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्याने पोटात गॅस, पित्त किंवा जुलाब होण्याची शक्यता वाढते.
केळीसुध्दा थंड प्रकृतीची असतात. त्यामुळे अंड्यासोबत केळी खाणे टाळावीत. अन्यथा कफ, खोकला होण्याची शक्यता असते.
अंडी खाल्ल्यानंतर लगेचच चहा किंवा कॉफी प्यायल्यास पोटातील अॅसिड वाढते. त्यामुळे पोटात जळजळ, अपचन आणि उलटी होऊ शकते.
अंडी आणि मद्य एकत्र घेतल्यास यकृतावर परिणाम होतो. अंड्यातील पोषकतत्त्वे शोषले जात नाहीत आणि विषारी प्रतिक्रिया होण्याचा धोका वाढतो.
अंडी खाल्ल्यानंतर लगेचच मिठाई किंवा गोड खाल्ल्यास पचन मंदावते. अंड्यातील अमिनो अॅसिड्स साखरेमुळे योग्यप्रकारे शोषले जात नाहीत. अधिक माहितीसाठी आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.