Anuradha Vipat
दुधासोबत विशिष्ट अन्नपदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते, शरीरात टॉक्सिन्स तयार होतात आणि त्वचेचे विकार उद्भवू शकतात.
संत्री, लिंबू, मोसंबी आणि अननस यांसारखी आंबट फळे दुधासोबत खाऊ नका.
एकत्र सेवनाने पचनसंस्थेवर ताण येतो आणि 'पांढरे डाग' सारखे त्वचेचे आजार होऊ शकतात.
मीठ आणि दुधाचे मिश्रण शरीरात संथ विष सारखे काम करते, ज्यामुळे त्वचाविकार वाढतात.
जेवणात कच्चा कांदा किंवा मुळा खाल्ला असल्यास लगेच दूध पिणे टाळा. यामुळे शरीरात खाज सुटणे, इसब आणि सोरायसिसचा धोका वाढू शकतो.
दूध आणि दही कधीही एकत्र किंवा एकापाठोपाठ एक खाऊ नये. यामुळे पोट फुगणे, अॅसिडिटी आणि उलट्या होण्याचा त्रास होऊ शकतो.
उडदाची डाळ आणि दूध एकत्र पचण्यास अत्यंत जड असतात. यामुळे पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेचा गंभीर त्रास होऊ शकतो.