sandeep Shirguppe
अनेक व्यक्तींना सतत सांधे दुखणे, हाडांचा आवाज येणे, हात पाय दुखणे या समस्या जाणवतात.
आपल्या हाडांच्या मजबुतीसाठी योग्य पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. त्याने तुमच्या हाडांना कॅल्शिअम मिळते.
कॅल्शिम कमी असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यावर आपण जास्तप्रमाणात दूध पितो. पण दुधापेक्षा जास्त कॅल्शिअम देणारी अन्नद्रव्य आहेत.
एक कप दही घेतल्यास त्यात ४८८ मिलीग्राम कॅल्शिअम असते. आपल्या आरोग्यासाठी दही फार चांगले आहे.
१ कप बदाममध्ये ४४९ मिलीग्राम कॅल्शिअम असते. साध्या दूधाच्या तुलनेत बदाम दूध जास्त पटीने चविष्ट असते.
१ कप संत्रीमध्ये ३४७ मिलिग्राम कॅल्शिअम असते. त्यामुळे जेवताना आहारात संत्र्याचे सेवन करा.
फक्त दूध पिणे अनेकांना आवडत नाही. तुम्हाला देखील फक्त दूध आवडत नसेल तर तुम्ही ओट्ससह हे खाऊ शकता.
१ कप फोर्टिफाइड सोयामिल्कमध्ये ३०० मिलीग्राम इतके कॅल्शिअम असते. मात्र गायीच्या दूधामधील कॅल्शिअमच्या तुलनेत यात कमी प्रमाणात कॅल्शिअम असते.