Anuradha Vipat
आज आम्ही तुम्हाला रिकाम्या पोटी कोणत्या पदार्थांचे सेवन करु नये व का याबद्दल सांगणार आहोत.
रिकाम्या पोटी काही पदार्थांचे सेवन करणे हे आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. काही पदार्थ असे आहेत जे रिकाम्या पोटी सेवन केल्यास पचनसंस्थेवर परिणाम करतात.
रिकाम्या पोटी कॉफी किंवा चहा पिल्यास तुमच्या पोटात जळजळ होऊ शकते
मसालेदार पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्यास पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
सिट्रस फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास तुमच्या पोटात जळजळ होऊ शकते.
टोमॅटो रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटात जळजळ होऊ शकते.
कोल्ड ड्रिंक्स, सोडा यांसारखी कार्बोनेटेड पेये रिकाम्या पोटी पिल्यास पोटात गॅस होऊ शकतो.