Anuradha Vipat
अनेक जण प्लास्टिकच्या बरणीत अन्न पदार्थ ठेवतात. पण तुम्हाला माहिती आहे का प्लास्टिकच्या बरणीत अन्न पदार्थ ठेवणे आरोग्यासाठी धोकादायक आहे .
प्लास्टिकच्या बरणीत पदार्थ न ठेवण्याची काही मुख्य कारणे आहेत. ती कारणे कोणती आहेत हे आज आपण पाहूयात.
तेल किंवा चरबीयुक्त पदार्थ प्लास्टिकमध्ये जास्त काळ ठेवल्यास प्लास्टिकचे विघटन होऊ शकते
पदार्थ प्लास्टिकमध्ये जास्त काळ ठेवल्यास प्लास्टिकमधील रसायने अन्नात मिसळू शकतात
आम्लयुक्त पदार्थ प्लास्टिकमध्ये साठवल्यास त्यातील रसायने अन्नात मिसळू शकतात.
प्लास्टिकमध्ये बीपीए सारखे हानिकारक रसायने असतात जी अन्नात मिसळू शकतात
प्लास्टिकच्या बरणीत ठेवलेल्या पदार्थांमध्ये विषारी पदार्थ मिसळू शकतात, ज्यामुळे कर्करोग, हार्मोनल असंतुलन आणि न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात