Anuradha Vipat
फूड पॉयझनिंग म्हणजेच अन्नबाधा ही दूषित, शिळे किंवा जीवाणू संसर्ग झालेले अन्न खाल्ल्यामुळे होणारी एक गंभीर समस्या आहे.
यामुळे पोटात तीव्र कळा येणे, उलट्या, जुलाब, मळमळ आणि अशक्तपणा यांसारखा त्रास होतो.
अशा वेळी शरीरातील विषारी घटक बाहेर काढणे आणि डिहायड्रेशन रोखणे अत्यंत महत्त्वाचे असते.
उलट्या आणि जुलाबामुळे शरीरातील पाणी आणि अत्यंत आवश्यक असलेली खनिजे झपाट्याने कमी होतात. हे डिहायड्रेशन रोखण्यासाठी ओआरएस सर्वोत्तम उपाय आहे.
आल्यामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे पोटातील जंतूंचा नाश करतात. तसेच आले मळमळ आणि उलट्या थांबवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.
सफरचंदाचे व्हिनेगर पोटातील ॲसिडची पातळी संतुलित करते. याच्या क्षारीय गुणधर्मांमुळे पोटातील संसर्ग वाढण्यास प्रतिबंध होतो आणि फूड पॉयझनिंगपासून तातडीने आराम मिळतो.
लसणामध्ये तीव्र अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल घटक असतात. पोटातील संसर्गजन्य जंतू नष्ट करण्यासाठी आणि जुलाब थांबवण्यासाठी लसूण प्रभावी आहे.