Neck Pain Yoga : मानेच्या दुखण्याने हैराण आहात? दररोज करा ही सोपे योगासने, मिळेल झटपट आराम!

Anuradha Vipat

सामान्य समस्या

मानेचे दुखणे किंवा सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस ही आजच्या काळात चुकीची जीवनशैली आणि तासनतास कॉम्प्युटर किंवा मोबाईलसमोर बसल्यामुळे होणारी एक सामान्य समस्या आहे.

Neck Pain Yoga | Agrowon

त्रास

सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसमुळे मानेमध्ये कडकपणा, तीव्र वेदना आणि कधीकधी चक्कर येणे यांसारखा त्रास होतो.

Neck Pain Yoga | Agrowon

मार्जरीआसन

हे आसन पाठीच्या आणि मानेच्या मणक्याला उत्तम ताण देते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि मानेचा कडकपणा दूर होतो.

Neck Pain Yoga | agrowon

भुजंगासन

भुजंगासनामुळे पाठीचा वरचा भाग आणि मानेचे स्नायू मजबूत होतात. कॉम्प्युटरवर काम करताना पुढे झुकणाऱ्या खांद्यांची स्थिती सुधारण्यासाठी हे उत्तम आहे.

Neck Pain Yoga | agrowon

बालासन

हे एक अत्यंत आरामदायी आसन आहे. यामुळे मान, खांदे आणि पाठीवरील ताण पूर्णपणे निघून जातो आणि मन शांत होते.

Neck Pain Yoga | Agrowon

मत्स्यासन

मत्स्यासनात मानेला मागच्या बाजूला विरुद्ध ताण मिळतो, ज्यामुळे गळ्याचे आणि मानेचे स्नायू मोकळे होतात आणि छातीचा भाग विस्तारतो.

Neck Pain Yoga | Agrowon

शलभासन

हे आसन पाठीच्या खालच्या आणि वरच्या भागाला मजबूत करते, तसेच मानेच्या मणक्याला आधार देणाऱ्या स्नायूंना ताकद देते.

Neck Pain Yoga | Agrowon

Lipoma Treatment : शरीरावरील चरबीच्या गाठी विरघळवण्यासाठी सोपे आणि खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय!

Lipoma Treatment | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...