Anuradha Vipat
अन्नातून विषबाधा झाल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे आणि पोटाला पूर्ण विश्रांती देणे हा महत्त्वाचा उपाय आहे.
दूषित, शिळे किंवा उघड्यावरील अन्न खाल्ल्यामुळे जिवाणू आणि विषाणू पोटात जातात.
सततच्या उलट्या आणि जुलाबांमुळे शरीरातील पाणी आणि क्षार वेगाने कमी होतात. हे टाळण्यासाठी दर तासाला ओआरएस प्यावे.
दुपारच्या वेळी जिरे घालून केलेले ताक प्यायल्याने पोटातील जळजळ कमी होते.
एकदम जास्त पाणी पिण्याऐवजी थोडे-थोडे पाणी प्यावे, जेणेकरून पुन्हा उलटी होणार नाही.
पहिल्या काही तासांत पोटाला आराम द्या. उलट्या थांबत नाहीत तोपर्यंत घट्ट अन्न खाणे टाळा.
आल्यामध्ये 'अँटी-बॅक्टेरियल' गुणधर्म असतात. कोमट पाण्यात आल्याचा रस आणि मध घालून पिण्याने पोटातील मुरडा आणि मळमळ कमी होते.