Mental Fatigue : मानसिक थकवा कमी करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

Mahesh Gaikwad

मानसिक थकवा

आजकालच्या स्पर्धेच्या युगात अतिरीक्त कामाच्या ताणामुळे अनेकांना मानसिक थकव्याच्या समस्येने ग्रासलेले आहेत. यामुळे अशा लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे.

Mental Fatigue | Agrowon

कार्यक्षमता

मानसिक थकव्याचा परिणाम आपल्या दैनंदीन कामकाजावर होतो. परिणामी यामुळे तुमची कार्यक्षमता प्रभावित होवून ती कमी होते.

Mental Fatigue | Agrowon

चिडचिडेपणा

दिवसभर थकल्यासारखे वाटत असल्याने कामावर लक्ष लागत नाही. याशिवाय कामाच्यावेळी चिडचिडेपणाही वाढतो.

Mental Fatigue | Agrowon

नकारात्मक विचार

मानसिक थकव्याचा परिणाम थेट तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेवर होतो. मनात सतत नकारात्मक विचार येत राहतात. तसेच शरीर आणि स्नायूंमध्ये वेदना आणि ताण जाणवतो.

Mental Fatigue | Agrowon

सतत आळस येतो

अनेकदा तुम्हाला मानसिक थकव्यामुळे कोणाला भेटावेसेही वाटत नाही. मानसिक थकव्यामुळे सतत आळस येतो.

Mental Fatigue | Agrowon

नियमित व्यायाम करा

या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी दरोरज नियमितपणे व्यायाम केल्यास मन प्रसन्न आणि शरीर निरोगी राहते. तसेच मनही सक्रीय राहते.

Mental Fatigue | Agrowon

पुरेशी झोप

पुरेशी झोप न झाल्यामुळेही दिवसभर थकल्यासारखे वाटत राहते. यासाठी दररोद किमान ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.

Mental Fatigue | Agrowon

योगासने

दिवसभराचा कामाचा ताण यामुळेही अनेकदा मानसिक थकवा जाणवतो. अशावेळी योगासाने केल्याने फायदा होईल.

Mental Fatigue | Agrowon

ध्यानधारणा

याशिवाय मानसिक थकवा कमी करण्यासाठी ध्यानधारणा केल्यामुळे मन शांत आणि दिवसभर उर्जावान राहते. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Mental Fatigue | Agrowon
अधिक पाहण्यासठी येथे क्लिक करा....