Anuradha Vipat
सिगारेट आणि तंबाखू हे कर्करोगाचे प्रमुख कारण मानले जाते. अगदी शुल्लक वाटणारी तंबाखू जीवघेणी ठरू शकते
तंबाखू किंवा सिगारेटच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही गोष्टींचा वापर उपयुक्त ठरू शकतो. यासाठी आम्ही दिलेले उपाय नक्कीच फायद्याचे ठरू शकतील
तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही सकाळी गरम पाण्यात लिंबू मिसळून पिऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात.
मनात व्यसनाचा विचार आल्यास जिथे असाल तिथे थोडाफार शारीरिक व्यायाम करावा अथवा १०- २० पुशअप्स मारावेत.
दिवसभरात १० ते १५ मिनिटे ध्यानधारणा केल्यास तुम्ही तुमच्या तंबाखू खाण्याच्या इच्छेवर ताबा मिळवू शकता.
जेव्हा तंबाखू खाण्याची इच्छा होईल तेव्हा पुदीन्याची पाने चघळा. पुदीन्याची पाने देखील तंबाखूचं व्यसन सोडण्यासाठी गुणकारी ठरू शकतात.