Mahesh Gaikwad
आजकाल वजन वाढणे ही जशी समस्या आहे, तशीच वजन कमी असणे ही सुध्दा एक समस्या आहे.
कमी वजन असणारे लोक शारीरीक व्यायाम करण्यासह वजन वाढीसाठी विविध उपाय करतात.
ज्यांना वजन वाढवायचे आहे, अशा लोकांसाठी संतुलित आहारासोबतच केळी खाणेही फायदेशीर आहे.
पण खरंच केळी खाण्यामुळे वजन वाढते का? याचीच माहिती आज आपण पाहणार आहोत.
केळामध्ये उच्च कॅलरी, कार्ब्स आणि साखर असते. याशिवाय केळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबरही असते.
तुम्ही दररोज संतुलित प्रमाणात केळी खाल्ली तर वजन कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे केळी खाऊन तुम्ही वजनही वाढवू शकता.
केळी खाऊन वजन वाढविणे किंवा कमी करणे हे तुम्ही केळी किती प्रमाणात खाता यावर अवलंबून असते.
त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांनी संतुलित प्रमाणात केळी खावी. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.