Aslam Abdul Shanedivan
पळसाचे फुल आणि साल यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे शरीरातील सूज आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.
पळसाच्या फुलांचा वापर ताप कमी करण्यासाठी केला जातो. त्यात नैसर्गिक ताप कमी करणारे गुणधर्म असतात.
पळसाचे बी मूत्रमार्गाच्या आजारांवर प्रभावी असते. ते मूत्रवर्धक असते, ज्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते.
पळसाच्या फुलांत असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि हृदयविकारांचा धोका कमी करतात.
पळसाचे बी आणि साल हे पचनास देखील मदत करणारे असते. याचा उपयोग पोटाच्या विकारांवर, विशेषतः जुलाब आणि आतड्यांच्या समस्या सोडवण्यासाठी होतो.
पळसाच्या फुलांचा लेप त्वचेवर लावल्यास त्वचेचे रोग, जसे की खाज कमी करण्यास मदत होते
पळसाचे फुल आणि बी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे डायबेटीसवर नियंत्रण ठेवता येते. (वापराआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या)