Roshan Talape
महाशिवरात्र निमित्त औंढा नागनाथ नगरी भक्तीमय होत असून, नागनाथ मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.
मध्यरात्रीनंतर जिल्हाधिकारी व आमदार यांच्या हस्ते प्रभू नागनाथाची महापूजा आणि दुग्धाभिषेक संपन्न झाला.
महापूजेनंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास मंदिर भाविकांसाठी खुले झाले आणि दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या.
नागनाथ मंदिर भव्य विद्युत रोषणाईने उजळले असून, फुलांनी सजलेले मंदिर भक्तांच्या स्वागतासाठी खुले करण्यात आले.
भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’च्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे.
भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे.
मुख्य पुजारी व पुरोहितांच्या उपस्थितीत अखंड महापूजा, भजन आणि विविध धार्मिक विधी पार पडले.
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर लाखो भक्तांनी श्रद्धाभावाने नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.