Anuradha Vipat
अळशीच्या बिया आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानल्या जातात. या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, फायबर आणि प्रोटीन्सचे प्रचंड भांडार असते.
हे फॅटी ॲसिड रक्ताभिसरण सुरळीत ठेवते, शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करते आणि पर्यायाने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
फायबरमुळे पचनक्रिया मंदावते आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे अवेळी लागणारी भूक नियंत्रित होते.
याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो, पोट साफ होते आणि आतड्यांचे आरोग्य निरोगी राहते.
यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन नैसर्गिक ग्लो येतो आणि केसांचे तुटणे थांबून ते मजबूत व चमकदार होतात.
यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना याचा मोठा फायदा होतो.
अळशीच्या बिया कधीही थेट खाऊ नयेत, कारण त्या शरीरात पचत नाहीत.