sandeep Shirguppe
जवस बियांच्या सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. रक्तदाबासह कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
एका रिसर्चनुसार हायपर टेंशन असलेल्या व्यक्तींनी जवसच्या बियांचं नियमित सेवन केल्यास ३ महिन्यांमध्ये ब्लड प्रेशरची समस्या दूर होवू शकते.
जवस बियांमध्ये लिग्नास अँटीऑक्सिडंट आणि एस्ट्रोजन तत्व असल्याने कॅन्सरचा धोका कमी होवू शकतो.
या बियांच्या सेवनाने भूक कमी लागते त्यामुळे तुम्ही अतिरिक्त कॅलरीजच सेवन करत नाही आणि वजन कमी होतं.
जवस बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे पचनसक्ती सुधारण्यास मदत होते. तसचं बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
जवसामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट आणि फाइटोकॅमिकल्स वाढत्या वयाची लक्षण कमी करण्यास मदत करतं.
जास्तीत जास्त प्रोटीन मिळवण्यासाठी जवस हा शाकाहारी लोकांसाठी चांगला पर्याय आहे. जवसला बेस्ट प्रोटीन मानलं जातं.
हार्मोनस बदलांमुळे मासिक पाळीचं चक्र बिघडतं यासाठी महिलांनी जवसाचं सेवन केल्यास होर्मोन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
जवसमध्ये अँटीआर्थराइटिक म्हणजेच संधीवात कमी करण्यासाठी आवश्यक प्रबाव असतो.