Team Agrowon
मध आणि त्यापासून तयार केलेल्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वाढत आहे. मधमाशीपालन करताना योग्य नियोजन केले, तर शेतीसाठी फायदा होईल तसेच व्यवसायातून उत्पन्न मिळू शकते.
महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने सातेरी आणि युरोपियन मधमाशीपालन केले जाते. ७० ते ८० टक्के पिके परागीभवनासाठी मधमाशीवर अवलंबून आहेत.
ही मधमाशी आकाराने सातेरी माशीपेक्षा मोठी असते. या मधमाश्या कृत्रिम लाकडी मधुपेट्यांत पाळतात. जगभरात ही माशी मोठ्या प्रमाणात मध उत्पादनासाठी वापरली जाते.
ही माशी आकारमानाने मध्यम असते. नैसर्गिक वातावरणात यांची पोळी झाडांच्या ढोलीत, खडकांतील भेगा, इमारतींच्या भिंतीतील आडोशाच्या जागा अशा आच्छादित ठिकाणी आढळतात.
भारतात आढळणाऱ्या मधमाश्यांमध्ये आकारमानाने ही सर्वांत मोठी आहे. ही मधमाशी डोंगरमाथ्यापासून उतरणीवर सर्वत्र आढळते.
भारतीय मधमाश्यामध्ये आकारमानाने सर्वांत लहान आहे. फुले फुलली की ही माशी आपले पोळे बांधते. फुलोरा संपला की उडून जाते.
या माश्यांचा डंख पुरेसा विकसित झालेला नसतो. त्या परागीकरण चांगल्या प्रकारे करतात. त्यांच्याद्वारे दर वर्षी ३०० ते ४०० ग्रॅम मध उत्पादन मिळते.