Team Agrowon
माशांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने, मासे लवकर खराब होतात. बर्फात मासळी ३ ते ५ दिवस ताजी राहू शकते. मासळीला जास्त दिवस जास्त दिवस खाण्यालायक ठेवायची असेल तर तिच्यावर प्रक्रिया केली पाहिजे.
मासे टिकवून ठेवण्यासाठी मासे एकत्रित किंवा वेगवेगळे करून गोठविता येतात. शीत यंत्राने माशांचे तापमान शून्यापेक्षा फार कमी म्हणजे -२०° ते ४०°C ला आणून गोठविले जाते अशा प्रकारे गोठविलेली मासळी मुख्यत्वेकरुन परदेशात निर्यात केली जाते.
समुद्रकिनारी उन्हामध्ये मासे सुकविण्याची पद्धत फार जुनी आहे. पण असे सुकविलेले मासे वाळूने दूषित होत असतात.
मिठात किंवा मिठाच्या द्रावणात बुडवून माशांमधील पाण्याचे प्रमाण २० ते २४ टक्के कमी करता येते.
मिठामुळे माशांची जंतूंमुळे खराब होण्याची क्रिया रोखली जाते. ती सर्वसाधारण तापमानातही काही दिवस चांगली राहतात.
मासे तेलात किंवा मिठाच्या द्रावणात हवाबंद करुन नंतर ते डबे निर्जंतुक केले असता जवळ जवळ वर्षभर टिकतात व आपल्याला हवे तेव्हा खाता येतात.
हवाबंद केलेल्या माशांमधील जंतू निर्जंतुकीकरणामुळे नष्ट होतात. हवाबंद डब्यातले मासे परदेशात फार प्रचलित आहेत.
Pomegranate Export : डाळिंब निर्यात सुसाट ; ४५ देशात पोहोचला भारतीय डाळिंबाची गोडवा