Kajava : अंधारात लुकलुकणारे काजवे तर शेतकऱ्यांचे मित्र

Team Agrowon

पावसाची चाहूल

मृग नक्षत्र लागले की पाऊस सुरु होतो. तापलेल्या उन्हानंतर हवा हळूहळू बदलू लागते तेव्हाच काजवे चमकू लागतात. पाऊस आता काही दिवसांत येणार याचा हा एक ठोकताळाच असतो.

Kajava | Agrowon

पावसापुर्वी काजव्यांच आगमन

बरोबर पावसाच्या आधी काजवे जमिनीवर अवतरतात. अंडी-अळी-कोष या अवस्थेतून वर्षभर जाणारे हे कीटक बरोबर या हंगामात उत्पन्न होतात.

Kajava | Agrowon

काजवे-काजविणींचा मिलनकाळ

पूर्ण वाढ झालेल्या प्रौढ कीटकांना काजवा म्हणतात. काजवे त्यांच्या विशिष्ट प्रकाशामुळे आकर्षक दिसतात. खरं तर प्रौढ काजवे-काजविणी यांचा हा मिलनकाळ असतो.

Kajava | Agrowon

काजव्यांच स्वयंवर

ठरावीक झाडांवर काजव्यांचे छान स्वयंवरच भरते. विशिष्ट चाळीत ओळीने बसलेले काजवे विशिष्ट लयीत व तालात आपला प्रकाश निर्माण करतात. हे बघणे खरेच अद्‍भुत असते.

Kajava | Agrowon

काजव्यांचे मिलन

मादी काजवे नर काजव्यांना दुरून बघत असतात. एकदा का यातील उत्तम व आपल्याला हवा तो प्रकाश असणारा काजवा मादीने हेरला की त्यांचे मिलन होते.

Kajava | Agrowon

काजवे शेतकऱ्यांसाठी मित्रकीटक

जमिनीवर आढळणारे गोगलगाय व छोटे मऊ लुसलुशीत किडे हे काजव्यांचे खाद्य आहे. त्यामुळे काजवे शेतकऱ्यांसाठी ‘मित्रकीटक’ ठरतात.

Kajava | Agrowon

कमी होतेय काजव्यांची संख्या

मध्यंतरी शेतकरी गोगलगायींमुळे त्रस्त झाले होते. शेतात गोगलगायींची संख्या अमर्यादित वाढल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. काजव्यासारखे मित्रकीटक कमी झाल्याचा हा परिणाम आहे.

Kajava | Agrowon

किटकनाशकांचा वापर काजव्यांसाठी हानीकारक

कीटकनाशकांचा सर्रास बेसुमार वापर केला जातो. जेथे जेथे या कीटकनाशकांचा वापर वाढला तेथे काजवे संपुष्टात आले.

Kajava | Agrowon