Bhide Wada : अखेर ऐतिहासिक भिडे वाडा जमीनदोस्त, पहा दुर्मिळ Photo

Swapnil Shinde

मुलींची पहिली शाळा

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.

Bhide Wada | Agrowon

राष्ट्रीय स्मारक

फुले दांपत्याने शाळा सुरू केलेल्या बुधवार पेठेतील भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याची अनेक वर्षांपासून मागणी होत आहे.

Bhide Wada | Agrowon

जागा मालक न्यायालयात

त्याला जागा मालक आणि पोट भाडेकरूंनी विरोध करत न्यायालयात आव्हान दिले.

Bhide Wada | Agrowon

जागेचा मोबादला

न्यायालयाने पुणे महापालिकेला जागेचा मोबदला देण्याचा आदेश दिला.

Bhide Wada | Agrowon

सर्वोच्च न्यायालयाकडून पुर्नविराम

त्याला भाडेकरूंनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचिका दाखल केली. परंतु न्यायालयाने ती दाखल करण्यास नकार दिला. त्यामुळे या वादावर पुनर्विराम मिळाला.

Bhide Wada | Agrowon

जागेचा ताबा

न्यायालयाने पालिकेला एका महिन्यात भिडे वाड्याची जागा ताब्यात घेण्याचे आदेशही दिले आहेत.

Bhide Wada | Agrowon

बांधकाम पाडले

प्रशासनाने भिडे वाड्यातील रहिवाशांना सोमवारी नोटीस पाठवून रात्री उशिरा बांधकामे पाडून जागा ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली.

Bhide Wada | Agrowon
आणखी पहा...