Anuradha Vipat
येत्या दिवाळीत पारंपारिक थाट आणि राजेशाही लुक देणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांची चलती आहे.
सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या दिवसांत शाही लुक मिळवून देणारे सोन्याचे काही खास ट्रेंडिंग दागिने खालीलप्रमाणे आहेत.
गळ्यालगत बसणारे चोकर नेकलेस कोणत्याही सिल्क साडी किंवा लेहेंग्यावर अतिशय भारदस्त आणि राजेशाही लुक देतात.
लक्ष्मी देवी, विठ्ठल-रखुमाई किंवा मयुराची नक्षी असलेले लाँग नेकलेस आणि मॅचिंग झुमके या दिवाळीत प्रचंड लोकप्रिय आहेत.
कड्यांच्या दोन्ही टोकांवर हत्ती किंवा सिंहाचे तोंड कोरलेले डिझाईन, तसेच त्यावर केलेली नाजूक मीनाकारी तुमच्या हातांना एक रॉयल टच देते.
मोत्यांचे लटकन असलेल्या सोन्याच्या चांदबाल्या आणि नक्षीदार झुमके इंडो-वेस्टर्न आणि पारंपरिक दोन्ही कपड्यांवर खूप उठून दिसतात.
छातीपर्यंत लटकणारे लाँग राणी हार हे शाही लुकचे मूळ प्रतीक मानले जातात. हे चोकर नेकलेससोबत लेअरिंग करण्यासाठी उत्तम ठरतात.