Mahesh Gaikwad
जगभरात प्राचीन काळापासून अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. या सणांना ऐतिहासिक महत्त्व आहे. जगभरात साजरे होणारे सगळ्यात जुन्या सण-उत्सवांबाबत जाणून घेवूया.
होळी हा रंगांचा सण आहे. हा सण भारतात साजरा होणाऱ्या सर्वात जुन्या सणांपैकी एक आहे. २००० हजार वर्षांपूर्वी या सणाची सुरूवात झाल्याचे म्हटले जाते.
वेनिस कार्निव्हल हा जगातील सर्वात जुन्या उत्सवांपैकी एक उत्सव आहे. याची सुरूवात मध्य युगात झाल्याची मान्यता आहे.
चीनी नववर्ष जानेवारी किंवा फेब्रूवारी दरम्यान साजरे केले जाते. हा उत्सव हजारो वर्षांपासून साजरा केला जातो. यालाच चंद्र नववर्ष असेही म्हणतात.
फसह हा सण सर्वात प्राचीन असा यहुदी सणांपैकी एक आहे. जो प्राचीन इजिप्तमध्ये गुलामीपासून इस्त्रायली लोकांच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.
ख्रिश्चन धर्माचे लोक ईस्टर हा सण २००० हजार वर्षांपूर्वीपासून साजरा करत आहेत. ईस्टर हा सण ४० दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. येशूच्या पुनरुत्थानाच्या पार्श्वभूमीवर साजरा करण्याची मान्यता आहे.
नौरोज हा इराणमध्ये साजरा होणारा सण आहे. नव्या वर्षाच्या रुपात हा सण गेल्या ३००० हजार वर्षांपासून साजरा केला जात आहे. हा एक फारसी सण आहे.
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. भारतात प्राचीन काळापासून दिवाळीचा सण साजरा केला जातो. अंधकारावर प्रकाशाचा विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळीचा सण साजरा केला जातो.