sandeep Shirguppe
गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून गुढी उभारण्याची जागा स्वच्छ करावी. यानंतर स्नान करून प्रार्थना करावी.
गुढी उभारण्याच्या जागेवर रांगोळी काढावी, शेजारी चैत्रांगण साकारावे.
घराच्या मुख्य दारावर आंब्याच्या पानांचे आणि फुलांचे तोरण बांधावे.
गुढी उभारण्यासाठी वेताची काठी स्वच्छ करून घ्यावी. सूर्याला नमस्कार करून गुढीवर हळदी-कुंकू लावून घ्यावे.
गुढीभोवती रेशमी कापड गुंडाळावे. त्यावर फुलांचा हार, साखरेची माळ लावावी आणि कडुलिंबाचा पाला गुंडाळावा.
हळदी-कुंकू, अक्षता वाहून गुढी उभारावी. पाटावर पानाचा विडा ठेवावा. अगरबत्ती, धूप लावावे. त्यानंतर, श्रीफळ अर्पण करावे.
यानंतर कडुलिंबासोबत चणाडाळ व गूळ घालून प्रसाद करून खावा.
सूर्यास्तापूर्वी नमस्कार करून गुढी खाली उतरावी, ही माहिती दैनिक सकाळला ज्योतीषविशारद अरूण टोपकर यांनी दिली.