Food West Fertilizer : मलेशियात रमजानच्या उपवासातील शिल्लक अन्नापासून खत निर्मिती

Mahesh Gaikwad

पवित्र रमजान

सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. या दिवसांत मुस्लिम बांधव दिवसभर उपवास करतात आणि सायंकाळी अन्न ग्रहण करतात.

Food West Fertilizer | Agrowon

रमजान उपवास

उपवास सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलेले अन्न फेकून दिले जाते. त्यावर मलेशिया सरकारने नामी उपाय शोधून काढला आहे.

Food West Fertilizer | Agrowon

अन्नाची नासाडी

मलेशियातील पहांग राज्य सरकारने रमजानाच्या दिवसांत होणारी अन्नाची नासाडी कमी करण्यासाठी विशेष उपक्रम राबविला आहे.

Food West Fertilizer | Agrowon

खत निर्मिती मशीन

पहांग राज्याची राजधानी कुआंतन शहराच्या मध्यभागी असलेल्या पार्कमध्ये वाया जाणाऱ्या अन्नापासून खत निर्मिती करणारे मोबाईल मशिन बसविण्यात आले आहेत.

Food West Fertilizer | Agrowon

शिल्लक अन्नापासून खत

दररोज संध्याकाळी उपवास सोडल्यानंतर अनेक कुटूंब शिल्लक राहिलेले अन्न या मशिनमध्ये टाकतात.

Food West Fertilizer | Agrowon

खत तयार होते

अन्नाचे तुकडे मशिनमध्ये टाकल्यानंतर ४८ तासांपर्यंत तांदळाच्या भुशासोबत हळूहळू मिसळले जाते.

Food West Fertilizer | Agrowon

खताचे पॅकिंग

त्यानंतर त्यातून बाहेर पडणारे तपकीरी रंगाचे वेस्ट मटेरियल शेतकऱ्यांना पॅकिंग करून खत म्हणून वापरण्यासाठी देतात.

Food West Fertilizer | Agrowon