Anuradha Vipat
प्रत्येक घरात सहज उपलब्ध असणारी आणि हिवाळ्यात आवर्जून खाल्ली जाणारी मेथीची भाजी सांधेदुखीवर अत्यंत गुणकारी मानली जाते.
सांधेदुखी आणि संधिवात असलेल्या रुग्णांसाठी मेथी एक नैसर्गिक औषधासारखे काम करते.
मेथीमध्ये मुबलक प्रमाणात दाहशामक घटक असतात. ते सांध्यांमधील सूज आणि वेदना कमी करण्यास थेट मदत करतात.
मेथीतील अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स नष्ट करतात, ज्यामुळे सांध्यांचे घर्षण आणि झीज कमी होते.
मेथीच्या भाजीत कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह चांगल्या प्रमाणात असते. हे घटक हाडे मजबूत करतात आणि सांध्यांचे आरोग्य सुधारतात.
मेथीचा स्वभाव उष्ण असल्याने ती शरीरातील अतिरिक्त वात कमी करते आणि सांध्यांना आराम देते
आहारात आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा मेथीच्या भाजीचा समावेश करा.