Anuradha Vipat
जेवणानंतर बडीशेप खाणे ही आपल्या भारतीय संस्कृतीतील एक जुनी परंपरा आहे.
बडीशेपमध्ये फायबर असतात जे पचनक्रिया गतिमान करतात. यामुळे अन्न लवकर पचते
बडीशेपमधील नैसर्गिक सुगंध तोंडाची दुर्गंधी दूर करते आणि तोंड ताजेतवाने ठेवते.
बडीशेपमध्ये वातनाशक गुणधर्म असतात. जेवणानंतर होणारी ॲसिडिटी , छातीत जळजळ किंवा गॅसची समस्या कमी होण्यास मदत होते.
पोट फुगणे यांसारख्या समस्यांवर बडीशेप प्रभावी उपाय आहे.
बडीशेप खाल्ल्याने शरीराचा चयापचय वाढते, ज्यामुळे वजन नियंत्रणात मदत मिळते.
बडीशेपमध्ये पोटॅशियम असते, जे शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.