Aslam Abdul Shanedivan
आपण एखाद्या हॉटेल किंवा घरात काही स्पेशल जेवन झाल्यावर बडीशेप आणि खडी साखर खातो.
बडीशेप आणि खडी साखर माउथ फ्रेशनरचे कॉम्बिनेशन असून ते आरोग्यादायीही आहे.
दररोज जेवल्यानंतर एक चमचा बडीशेप आणि खडी साखर खाणे खाल्ल्यास आपल्या आरोग्याला अनेक लाभ मिळतात
बडीशेप आणि खडी साखर खाल्ल्यास आपली पचनक्रिया चांगली होते. तसेच अपचन, बद्धकोष्ठता किंवा अॅसिडिटीचा त्रासही कमी होतो.
अनेकदा ब्रश करूनही तोंडाची दुर्गंधी जात नाही अशा वेळी बडीशेप आणि साखरेचे कॉम्बिनेशन ट्राय केल्यास तोंडाचा घाणेरडा वास बऱ्याच अंशी दूर होतो
मासिक धर्माच्या दिवसांमध्ये अनेक महिलांना लोह आणि हिमोग्लोबिनची कमतरता जाणवते. अशा वेळी बडीशेप आणि खडी साखरेचे सेवन केल्यास ही समस्या दूर होते.
बडीशेप आणि खडी साखरेचे सेवन डोळ्यांसाठी फायदेशीर असून बडीशेप आणि खडी साखरेची पूड दुधातून रोज प्यायल्याने डोळ्यांच्या समस्या दूर होतात आणि दृष्टी सुधारते. (Disclaimer : ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)