Anuradha Vipat
मासिक पाळीच्या काळात शरीराला जास्त ऊर्जेची आणि लोहाची गरज असते.
जर तुम्ही मासिक पाळीच्या काळात उपवास करत असाल तर आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून खालील गोष्टी लक्षात ठेवा.
पाळीच्या काळात रक्ताक्षयामुळे शरीरात पाणी कमी होऊ शकते. उपवासामुळे थकवा आणि 'डिहायड्रेशन' होऊ शकतं
उपवासाच्या आहारात सफरचंद, डाळिंब, खजूर किंवा सुका मेवा यांचा समावेश करा. यामुळे अशक्तपणा जाणवणार नाही.
उपवासात वरीचा तांदूळ , राजगिरा किंवा रताळे यांसारखे पौष्टिक पदार्थ खा.
पाळीच्या दिवसात चक्कर येणे किंवा मळमळणे असा त्रास होतो. अशा वेळी कडक उपवास करू नका.
उपवास असताना आणि पाळी सुरू असताना शरीराची ऊर्जा कमी असते. त्यामुळे या काळात जड व्यायाम किंवा खूप धावपळ करणे टाळा