Anuradha Vipat
जास्त प्रमाणात फास्ट फूड खाणे आरोग्यासाठी मुळीच योग्य नाही. त्याचे शरीरावर होणारे परिणाम अत्यंत गंभीर असू शकतात.
फास्ट फूडमध्ये कॅलरीज, साखर आणि फॅट्सचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे वजन वेगाने वाढते.
यात मोठ्या प्रमाणावर 'सॅच्युरेटेड फॅट्स' आणि 'ट्रान्स फॅट्स' असतात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका होऊ शकतो.
फास्ट फूडमध्ये असलेल्या अति साखरेमुळे आणि मैद्यामुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी बिघडते.
या पदार्थांमध्ये फायबर नसतात. त्यामुळे बद्धकोष्ठता , अपचन आणि गॅसेसच्या समस्या निर्माण होतात.
अति प्रमाणात जंक फूड खाणाऱ्या लोकांमध्ये नैराश्य आणि चिडचिडेपणा येण्याचे प्रमाण जास्त असते.
जास्त तेलकट आणि तिखट फास्ट फूडमुळे चेहऱ्यावर मुरुमे येणे आणि त्वचा तेलकट होणे अशा समस्या उद्भवतात.