Farmer protest : पोलंड आणि इटालीत शेतकरी उतरले रस्त्यावर

Team Agrowon

मागच्या दिड महिन्यांपासून युरोपियन महासंघ शेतकऱ्यांच्या आक्रोशानं धगधगतो. आकारानं छोट्या असलेल्या या युरोपियन देशातील शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोंड लपवण्याची वेळ आणली.

वास्तविक या देशात मूठभर शेतकरी आहेत. पण त्यांच्या आक्रोशानं मात्र जगाचं लक्ष वेधलं आहे. गुरुवारी (ता.१५) इटली आणि पोलंडमध्ये शेतकरी आंदोलन भडकलं. 

हजारो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले. युरोपियन महासंघाच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी घोषणा दिल्या. हजारो शेतकरी जमा झाले होते. तिथे टायर जाळले. आणि कार्यालयावर अंडी फेकली.

यापूर्वीही युरोपियन महासंघातील जर्मनी, फ्रान्स, स्पेन या देशाच्या राजधानीत शेतकरी कचरा, शेतमाल आणि गटारातील घाण टाकून आंदोलन करत होते.

त्यात ट्रॅक्टर रस्त्यावर उभे करून वाहतूकही ठप्प करत होते. पण दिवसेंदिवस युरोपियन महासंघातील शेतकऱ्यांचं आंदोलन अधिक तीव्र होऊ लागलं आहे.

काही देशात ३० दिवसांचं आंदोलनही पुकारलं गेलं. पोलंडच्या शेतकऱ्यांनी तर २० फेब्रुवारीपर्यंत युरोपियन महासंघानं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर युक्रेनच्या सर्व सीमा बंद करू असा इशाराही दिला आहे.