Swarali Pawar
जमिनीतील ओलावा कमी होत असताना वारंवार मशागत करणे टाळण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. शून्य मशागतीमुळे जमिनीतील ओलावा आणि मातीचे आरोग्य टिकवण्यास मदत होते.
मातीतील सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध करून देतात. जास्त उष्णता आणि वारंवार मशागतीमुळे त्यांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.
दुष्काळात नांगरणी आणि वारंवार कोळपणी टाळल्यास जमिनीतील ओलावा टिकवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे पिकांच्या मुळांजवळ उपलब्ध असलेले पाणी जपता येते.
कापणीनंतरचे पिकांचे अवशेष शेतात पसरवून आच्छादन करा. हे अवशेष कुजल्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढण्यास मदत होते.
कोरड्या जमिनीत मशागत केल्यास वाऱ्यामुळे माती उडून जाण्याचा धोका वाढू शकतो. पिकांचे अवशेष जमिनीवर ठेवल्याने मातीचे संरक्षण होण्यास मदत होते.
तण जमिनीतील पाणी आणि अन्नद्रव्यांसाठी पिकांशी स्पर्धा करतात. त्यामुळे शून्य मशागत करतानाही वेळेवर तण नियंत्रण करा.
ज्या भागात पावसाची मोठी तूट आहे आणि जमिनीत पुरेसा ओलावा नाही, तिथे पेरणीची घाई करू नका. उपलब्ध पाणी आणि हवामानाचा अंदाज पाहूनच पीक घेण्याचा निर्णय घ्या.
दुष्काळात पीक घेणे शक्य नसेल, तर अनावश्यक खर्च टाळून जमिनीवर काडीकचरा आणि पिकांचे अवशेष पसरवा. यामुळे ओलावा टिकवणे आणि जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे संवर्धन करणे शक्य होते.