Alimbi Business : मित्राचा सल्ला मोलाचा! हातात काहीही नसताना सुरू केला आळिंबी व्यवसाय अन्

sandeep Shirguppe

रामचंद्र खाचू गावडे

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड या दुर्गम तालुक्यातील म्हाळुंगे गावच्या रामचंद्र खाचू गावडे एका अल्पभुदारक शेतकऱ्याने आंळिंबी व्यवसायातून यशस्वी वाटचाल केली आहे.

Alimbi Business | agrowon

आळिंबी व्यवसाय

हृदयाचे ऑपरेशन झाले. हातात असलेला जॉब गेला, आर्थीक परिस्थिती नसल्याने मित्राने अळिंबी व्यवसाय करण्याचा पर्याय सूचवला.

Alimbi Business | agrowon

कोरोना काळात हिंमत हारली नाही

सन २०१७ मध्ये उपलब्ध जागेत अळिंबी निर्मिती सुरू झाली. कोरोना काळात त्यात खंड पडला. पण हिंमत न हारता गावडे वाटचाल सुरू ठेवली.

Alimbi Business | agrowon

वीस लाखांचे भांडवल

२०२१ मध्ये आपल्या शेताच्या चार गुंठ्यांत शेड बांधले, शेड, रैंक, ह्युमिडीफायर व अन्य उपकरणे असे मिळून वीस लाख रुपये भांडवल गुंतवले.

Alimbi Business | agrowon

चिंगरी आळिंबीचे उत्पादन

१२०० बेडसमध्ये चिंगरी अळिंबीचे उत्पादन सध्या घेतात. बेडनिर्मितीसाठी सोयाबीन, कपाशीचे काढ किंवा भाताचे पिंजर यांचा वापर बेड तयार केले जातात.

Alimbi Business | agrowon

'इनक्युबेशन रूम

विवाणे (स्पॉन) रुजवून व बेड तयार झाल्यानंतर सुमारे अठरा दिवस 'इनक्युबेशन रूम मध्ये ते ठेवले जातात. त्यानंतर 'प्रोइंग रूम'मध्ये आणले जातात.

Alimbi Business | agrowon

१५ दिवसांची प्रक्रिया

गावडे यांनी 'फॉगर्स', ह्यूमिडीफायर आदी यंत्रणा लावली आहे. येथे पाच-सहा दिवसांनंतर अळिंबीचे 'पिन हेड' निघण्यास सुरुवात होते. त्यानंतर दोन-चार दिवसांत उत्पादन मिळू लागते.

Alimbi Business | agrowon

काढणी, उत्पादन, पॅकिंग

प्रति बेड प्रति १० दिवसांनी एक याप्रमाणे एका महिन्यात तीन काढण्या होतात. त्यातून एक ते सव्वा किलो अळिंबी मिळते. एक दिवसाआड बेड तयार केले जातात.

Alimbi Business | agrowon

मेहनतीतून मिळवली बाजारपेठ

चंदगडसारख्या भागात अळिंबीला बाजारपेठ मिळवणे मोठे आव्हान होते.रस्त्याकडेला उभारून विक्री करत ग्राहकांची संख्या वाढवली.

Alimbi Business | agrowon

गोव्याची 'फिक्स' बाजारपेठ

गोव्यामध्ये अळिंबीला रोजची मागणी असल्याचे ओळखून गावडे यांनी प्रसिद्ध गोवा बागायतदार संघाला एकही दिवस खंड ३० किलोपर्यंत अळिंबीचा पुरवठा करतात.

Alimbi Business | agrowon

२०० रुपये किलो दर

अळिंबीस २०० रुपये प्रति किलो हा फिक्स दर दोन वर्षापासून मिळतो. विशेष म्हणजे गावडे यांनीच हा दर ठरविला आहे. महिन्याला सुमारे ६० टक्क्यांपर्यंत नफा मिळतो.

Alimbi Business | agrowon

संशोधन

अळिंबी निर्मितीसाठी पुणे, बंगळूरहून स्पॉन (बोज) आणावे लागे. अशावेळी स्वतःच स्पॉन तयार करायचे गावडे यांनी ठरवले. काहींच्या मदतीने स्पॉननिर्मितीत गावडे स्वयंपूर्ण झाले आहेत.

Alimbi Business | agrowon
आणखी पाहा...