Farm Pond Water : शेततळ्यातील पाणी टिकवून ठेवण्याचे उपाय

Team Agrowon

शेततळ्याचा पृष्ठभाग लहान ठेवणे

द्रव्याचे आकारमान जेवढे अधिक, तेवढा त्याचा बाष्पीभवनचा दर वाढत असतो. जास्त लांबी-रुंदी असणारे शेततळे न बांधता जास्त खोली असणारे शेततळे बांधावे.

Farm Pond Water | Agrowon

सजीव कुंपण

शेततळ्याच्या बाजूने उंच व दाट झाडांचे कुंपण करावे. जेणेकरून वाहणाऱ्या वाऱ्याचे तापमान कमी होऊन उष्ण वाऱ्याद्वारे होणारे बाष्पीभवन कमी होऊ शकेल.

Farm Pond Water | Agrowon

भिंत उभारणी

शेततळ्याच्या आजूबाजूने तीन मीटर उंचीची भिंत बांधावी. उपलब्ध माती व मुरुमाचा वापर करून तात्पुरती भिंत उभारल्यास हरकत नाही. परंतु भिंतीची उंची शेततळ्यापेक्षा जास्त असावी.

Farm Pond Water | Agrowon

विविध तेलांचा वापर

निंबोळी किंवा एरंडी या वनस्पतिजन्य तेलांचाही वापर बाष्पीभवन नियंत्रणासाठी करता येतो. संपूर्ण शेततळ्यामधील उपलब्ध पाण्याच्या पृष्ठभागावर या तेलांचा तवंग पसरवून बाष्पीभवन रोखता येते.

Farm Pond Water

थर्माकोलचा वापर

सध्या प्लॅस्टिक व थर्माकोलच्या वापरावर बंदी आली आहे. थर्माकोलचे तुकडे शेततळ्यात सहजपणे पसरविता येतात. त्याचा वापर जास्त कालावधीसाठी करता येऊन त्यापासून कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही.

Farm Pond Water

रसायनांचा वापर

केओलिन हे खडूच्या भुकटीसारखे रसायन आहे. सुमारे एक कोटी लिटर पाण्यासाठी तीन किलो भुकटी लागते. या रसायनाचा टिकाऊपणा अत्यंत कमी असतो. प्रत्येक ८ ते १२ दिवसांमध्ये ही पावडर तळाशी जाते.

Farm Pond Water

अन्य घटक

पालापाचोळा, तांदळाचा भुस्सा, गव्हाचे काड, हलके फ्लोटिंग ऑब्जेक्ट्स, पीव्हीसी बॉल्स, प्लॅस्टिक आदींचे आच्छादन; शेवाळ-जलपर्णी संवर्धन, विविध रंगांचा वापर तसेच शेततळ्यावर कापडाच्या आवरणाचा वापर करूनही शेततळ्यातील बाष्पीभवन कमी करता येते.

Farm Pond Water | Agrowon

Onion Processing : वाळलेल्या कांद्यापासून कोणते पदार्थ तयार होतात?