Anuradha Vipat
अचानक चक्कर येणे म्हणजे मेंदूला तात्पुरता रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे व्यक्ती काही काळासाठी बेशुद्ध होणे.
चक्कर आलेल्या व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी पाठीवर सरळ झोपवा. जर झोपवणे शक्य नसेल, तर तिला डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये घेऊन बसायला सांगा.
व्यक्तीला पाठीवर झोपवल्यानंतर तिचे दोन्ही पाय जमिनीपासून साधारण १२ इंच उंचावर करा. यासाठी पायांखाली उशी, बॅग किंवा कपड्यांची घडी ठेवू शकता.
व्यक्तीच्या गळ्याभोवतीचा कपडा, शर्टची बटणे, टाय, बेल्ट किंवा घट्ट कपडे ताबडतोब सैल करा. तसेच, व्यक्तीच्या भोवती गर्दी करू नका आणि खिडक्या उघडून भरपूर हवा येऊ द्या.
व्यक्तीच्या तोंडात अन्न, च्युइंगम किंवा लाळ अडकली नाही ना याची खात्री करा. व्यक्ती शुद्धीवर येत असताना किंवा उलट्या करत असल्यास तिला एका कुशीवर वळवून झोपवा.
बेशुद्ध व्यक्तीच्या तोंडात पाणी किंवा कोणतेही पेय टाकण्याचा प्रयत्न करू नका. तसेच, व्यक्ती पूर्णपणे शुद्धीवर येण्यापूर्वी तिला उठवून उभे करू नका किंवा चालवू नका.
पूर्ण शुद्धीवर येण्यापूर्वी उभे केल्यास पुन्हा चक्कर येऊन पडण्याची शक्यता असते