Anuradha Vipat
हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते, कारण थंडीमुळे त्वचा खूप कोरडी आणि निर्जीव होते.
कोरड्या आणि निर्जीव त्वचेसाठी फेस सिरम वापरणे अत्यंत फायदेशीर ठरते. हिवाळ्यात चेहऱ्यावर फेस सिरम लावण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.
फेस सिरम लावल्यामुळे हिवाळ्यात त्वचेला आवश्यक असलेले हायड्रेशन मिळते आणि त्वचा मऊ राहते.
फेस सिरम लावल्यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
रात्री झोपण्यापूर्वी सिरम लावल्यास त्यातील पोषक घटक रात्रभर त्वचेच्या दुरुस्तीचे काम करतात.
चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर त्वचेवर लगेच सिरमचे काही थेंब लावा आणि हलक्या हाताने मसाज करा.
हिवाळ्यात फेस सिरमचा वापर केल्याने तुमची त्वचा मऊ, चमकदार आणि निरोगी राहण्यास मदत होते.