Anuradha Vipat
कमी खर्चात भुवया छान दाट व जाड करण्याचे काही सोपे घरगुती उपाय आहेत. चला आज आपण त्या उपायांचा कसा वापर करायचा जाणून घेऊयात.
एरंडेल तेल भुवयांच्या वाढीत मदत करतात. एरंडेल तेलाचा हलक्या हातांनी मसाज करा.
कोरफडीतील जीवनसत्त्वे आणि खनिजांमुळे भुवया मजबूत होतात.
कांद्याच्या रसामध्ये भरपूर पोषक घटक असतात त्यामुळे भुवया जाड होतात.
मेथी दाण्यांची पेस्ट बनवून ती भुवयांवर लावा त्यामुळे केसांची वाढ होईल.
व्हॅसलीन भुवयांना हायड्रेट करते. त्यांमुळे केस वाढण्यास मदत होते
संतुलित आहाराचा समावेश केल्याने भुवयांची वाढ होण्यास मदत होते.