Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्रांनुसार डोळा फडफडणे हे स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळे संकेत देते.
पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे अत्यंत शुभ मानले जाते. हे धनलाभ, प्रगती किंवा एखादी आनंदाची बातमी मिळण्याचे लक्षण मानले जाते.
पुरुषांचा डावा डोळा फडफडणे अशुभ मानले जाते. यामुळे जुनी कामे बिघडणे किंवा त्रासाचे संकेत मिळू शकतात.
स्त्रियांचा डावा डोळा फडफडणे शुभ मानले जाते. हे सुख-समृद्धी किंवा धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते.
स्त्रियांचा उजवा डोळा फडफडणे अशुभ मानले जाते. हे कामात अडथळे किंवा अशुभ बातमी मिळण्याचे संकेत मानले जातात.
मानसिक ताणतणावामुळे डोळ्यांच्या स्नायूंवर परिणाम होतो आणि डोळा फडफडतो.
जर तुमची झोप पूर्ण झाली नसेल, तर डोळ्यांच्या नसांना विश्रांती मिळत नाही.