Dussehra Traditions : दसरा विशेष: शस्त्रेच नाही, तर गाड्या आणि मशीनची पूजा करण्यामागे दडलंय 'हे' मोठे कारण!

Anuradha Vipat

यंत्रांची आणि शस्त्रांची पूजा

दसऱ्याच्या म्हणजेच विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आपण सर्वांनीच आपल्या घरातील वाहनांची, यंत्रांची आणि शस्त्रांची पूजा करताना पाहिले आहे.

Dussehra Traditions | agrowon

धार्मिक आणि कृतज्ञतेचे कारण

या दिवशी शस्त्रांचीच नव्हे, तर आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेल्या वाहनांची आणि यंत्रांची पूजा का केली जाते, यामागे एक अतिशय सुंदर धार्मिक आणि कृतज्ञतेचे कारण आहे.

Dussehra Traditions | agrowon

कथेनुसार

महाभारतातील कथेनुसार, जेव्हा पांडवांचा १ वर्षाचा अज्ञातवास संपला, तेव्हा त्यांनी विजयादशमीच्याच दिवशी शमीच्या झाडावरून आपली अस्त्रे आणि शस्त्रे परत काढली.

Dussehra Traditions | agrowon

विजय

त्यांनी ती शस्त्रे स्वच्छ केली आणि त्यांची पूजा करून विराट राजाच्या गाईंची सुटका करण्यासाठी कौरवांविरुद्ध युद्ध पुकारले आणि विजय मिळवला.

Dussehra Traditions | agrowon

प्रथा

तेव्हापासून विजयाची सुरुवात करण्यासाठी आपल्या प्रगतीच्या साधनांची पूजा करण्याची प्रथा पडली.

Dussehra Traditions | agrowon

आदर व्यक्त

हिंदू संस्कृती ही कृतज्ञता मानणारी संस्कृती आहे. ज्या गोष्टी आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा आणि रोजगार मिळवून देतात, त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणे हा या पूजेचा मुख्य उद्देश आहे.

Dussehra Traditions | agrowon

कामगार आणि व्यावसायिक

कारखान्यातील कामगार, इंजिनिअर्स आणि व्यापारी त्यांच्या रोजीरोटीचे साधन असलेल्या मशिन्सची आणि उपकरणांची पूजा करतात.

Dussehra Traditions | agrowon

Shami Tree Puja : दसऱ्याला शमीच्या झाडाची पूजा का करतात? पांडव आणि प्रभू श्रीरामांशी जोडलाय 'हा' रंजक इतिहास!

Shami Tree Puja | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...