Anuradha Vipat
गणेश पुराणात गणपतीच्या चार अवतारांचा उल्लेख आहे
तसेच मुद्गल पुराणात गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन केले आहे.
या अवतारांमध्ये वक्रतुंड, एकदंत, गजानन, लंबोदर आणि विघ्नराज यांचा समावेश आहे
गणेश पुराणात गणपतीचे चार अवतार जे सत्य, त्रेता, द्वापर आणि कलियुगात झाले आहेत.
वक्र सोंड असलेला अवतार म्हणजे वक्रतुंड , एक दात असलेला अवतार म्हणजे एकदंत, मोठे पोट असलेला अवतार म्हणजे महोदर, हत्तीसारखे डोके असलेला अवतार म्हणजे गजानन .
लांब पोट असलेला अवतार म्हणजे लंबोदर, असामान्य रूप असलेला अवतार म्हणजे विकट, अडथळ्यांवर विजय मिळवणारा राजा अवतार म्हणजे विघ्नराज आणि राखाडी रंगाचा अवतार म्हणजे धूम्रवर्ण.
अष्टविनायक मंदिरे गणपतीच्या या प्रमुख अवतारांना समर्पित आहेत जी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.