Anuradha Vipat
स्वयंपाकघरातील मसाले 'एक्सपायरी डेट' संपल्यानंतर वापरणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
जुन्या मसाल्यांमध्ये बॅक्टेरिया किंवा बुरशी वाढण्याची शक्यता असते. पोटदुखी, जुलाब किंवा उलट्यांसारखे फूड पॉयझनिंग होऊ शकते.
मसाल्यांमध्ये असलेले नैसर्गिक तेल आणि अँटी-ऑक्सिडंट्स ठराविक काळानंतर नष्ट होतात.
एक्सपायर्ड मसाल्यांचा रंग फिका पडतो आणि त्यांचा मूळ स्वाद निघून जातो.
बुरशीयुक्त मसाल्यांमुळे त्वचेवर खाज येणे किंवा श्वसनाचे विकार असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो.
काही मसाले ओलाव्यामुळे खराब होतात आणि त्यात 'मायकोटॉक्सिन' सारखे विषारी घटक तयार होऊ शकतात.
जर मसाल्याचा सुगंध बदलला असेल किंवा त्यात गुठळ्या झाल्या असतील, तर तो लगेच फेकून द्यावा.