Shahu Mill Exhibition Kolhapur : शाहू मिलमध्ये सगळं कोल्हापूर अनुभवा प्रदर्शनातून

sandeep Shirguppe

महासंस्कृती महोत्सव

कोल्हापुरातील श्री शाहू छत्रपती मिल येथे महासंस्कृती महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.

Shahu Mill Exhibition Kolhapur | agrowon

शिवकालीन छायाचित्र

महासंस्कृती महोत्सवात शिवकालीन छायाचित्र, ऐतिहासिक व दुर्मिळ शस्त्रांचे, स्थानिक हस्तकला प्रदर्शन यासह खाद्य संस्कृती पहायला मिळणार आहे.

Shahu Mill Exhibition Kolhapur | agrowon

4 फेब्रुवारीपर्यंत महोत्सव

आजपासून सुरु झालेला सांस्कृतिक महोत्सव 4 फेब्रुवारी पर्यंत मोफत सर्वांसाठी सुरु असणार आहे.

Shahu Mill Exhibition Kolhapur | agrowon

जिल्हाधिकारी राहुल रेखावार

यानिमीत्त जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, या महोत्सवाचा उद्देश आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविणे व आपल्या पारंपरिक कला सर्वांच्या समोर आणणे हा आहे.

Shahu Mill Exhibition Kolhapur | agrowon

मराठी संस्कृती

आपली मराठी संस्कृती सादर करण्यासाठी स्थानिक तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून कलाकार येणार आहेत.

Shahu Mill Exhibition Kolhapur | agrowon

ठिकाण शाहू मिल

आपले आवडते ठिकाण शाहू मिल येथे स्थानिक कलाकारांना व त्यांच्या कलागुणांना प्रशासनाने चांगले व्यासपीठ तयार करुन दिले आहे.

Shahu Mill Exhibition Kolhapur | agrowon

ही असेल वेळ

प्रदर्शनीय कलादालने सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत सुरु असणार आहेत.

Shahu Mill Exhibition Kolhapur | agrowon

सांस्कृतिक कार्यक्रम

तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम दोन टप्प्यात 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत व 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत सुरु असणार आहेत.

Shahu Mill Exhibition Kolhapur | agrowon

महाराष्ट्राच्या पाऊलखुणा

महाराष्ट्राच्या पाऊलखुणा, गौरव मायमराठीचा, शाहीरी, गुढी महाराष्ट्राची अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Shahu Mill Exhibition Kolhapur | agrowon