Wellness Tips : सावधान! जास्त मीठ आणि वारंवार पेनकिलर्स घेण्याच्या सवयीमुळे तुमची किडनी होऊ शकते निकामी!

Anuradha Vipat

अतिरिक्त ताण

जास्त मीठ खाण्यामुळे शरीरातील रक्तदाब वाढून किडनीच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण येतो.

Wellness Tips | agrowon

पेनकिलर्स

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार पेनकिलर्स घेतल्याने किडनीला होणारा रक्तपुरवठा कमी होऊन तिची फिल्टर करण्याची क्षमता कायमस्वरूपी खराब होऊ शकते.

Wellness Tips | Agrowon

रक्तदाब वाढणे

आहारात मीठ जास्त असल्यास शरीरात पाणी साचून राहते. यामुळे रक्ताचे प्रमाण वाढून रक्तदाब वाढतो, ज्याचा थेट ताण किडनीच्या नाजूक फिल्टरवर पडतो.

Wellness Tips | Agrowon

प्रथिने बाहेर पडणे

सततच्या उच्च रक्तदाबामुळे किडनीचे फिल्टर कमकुवत होतात आणि लघवीवाटे शरीरातील आवश्यक प्रथिने बाहेर पडू लागतात, हे किडनी खराब होण्याचे सुरुवातीचे लक्षण आहे.

Wellness Tips | Agrowon

किडनी स्टोनचा धोका

जास्त सोडियममुळे लघवीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढते. हे कॅल्शियम ऑक्सलेट किंवा फॉस्फरससोबत एकत्र येऊन किडनी स्टोन तयार होण्यास कारणीभूत ठरते.

Wellness Tips | agrowon

हृदय आणि किडनीवर दुहेरी ताण

मीठ जास्त खाल्ल्याने किडनीचे कार्य मंदावते आणि त्याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावरही होतो.

Wellness Tips | Agrowon

रक्तपुरवठा कमी होणे

पेनकिलर्स शरीरातील 'प्रोस्टॅग्लँडिन' नावाच्या रसायनाचे प्रमाण कमी करतात. हे रसायन किडनीला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या उघड्या ठेवण्यास मदत करते.

Wellness Tips | agrowon

Night Skincare : रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा 'हे' पदार्थ, सकाळी दिसेल नैसर्गिक ग्लो

Night Skincare | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...