Night Skincare : रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा 'हे' पदार्थ, सकाळी दिसेल नैसर्गिक ग्लो

Anuradha Vipat

त्वचा निस्तेज

दिवसभरातील धूळ, प्रदूषण आणि उन्हामुळे त्वचा निस्तेज होते.

Night Skincare | agrowon

उत्तम फायदा

रात्रीच्या वेळी आपली त्वचा स्वतःला रिपेअर करत असते, त्यामुळे झोपण्यापूर्वी खालीलपैकी कोणताही एक नैसर्गिक पदार्थ लावल्यास उत्तम फायदा होतो.

Night Skincare | agrowon

कोरफड जेल आणि व्हिटॅमिन ई

शुद्ध कोरफड जेलमध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील तेल मिसळून चेहऱ्यावर २ मिनिटे हलका मसाज करा आणि रात्रभर तसेच राहू द्या.

Night Skincare | Agrowon

कच्चे दूध आणि केशर

कच्च्या दुधात केशराच्या २-३ काड्या १५ मिनिटे भिजत ठेवा. कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण स्वच्छ चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर झोपी जा आणि सकाळी साध्या पाण्याने चेहरा धुवा.

Night Skincare | agrowon

गुलाबपाणी आणि ग्लिसरीन

गुलाबपाण्यात ३ ते ४ थेंब ग्लिसरीन मिसळून चेहऱ्यावर व मानेवर लावा. त्वचेचा ओलावा टिकून राहतो, ओपन पोअर्स कमी होतात आणि त्वचा फ्रेश दिसते.

Night Skincare | agrowon

बदामाचे तेल किंवा खोबरेल तेल

हातावर बदामाच्या तेलाचे ३-४ थेंब घेऊन दोन्ही तळव्यांवर चोळा आणि चेहऱ्यावर खालून वरच्या दिशेने हलका मसाज करा.

Night Skincare | agrowon

काकडीचा रस आणि गुलाबपाणी

ज्यांची त्वचा जास्त तेलकट आहे किंवा ज्यांना उष्णतेमुळे मुरुम येतात, त्यांनी हा पर्याय निवडावा.

Night Skincare | Agrowon

Garlic And Ginger : हृदयाचे आरोग्य सुधारणारे घरगुती उपाय: लसूण आणि आल्याचे फायदे

Garlic And Ginger | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...