Anuradha Vipat
आपण दररोज घरात वापरत असलेल्या काही सामान्य वस्तू आणि पदार्थांमध्ये कर्करोगास कारणीभूत ठरू शकणारी घातक रसायने लपलेली असतात.
या वस्तूंच्या दीर्घकाळ आणि अयोग्य वापरामुळे शरीरातील पेशींचे नुकसान होऊन कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
प्लास्टिकच्या डब्यात गरम अन्न ठेवल्यास किंवा मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यास ही रसायने अन्नात मिसळतात, ज्यामुळे हार्मोनल असंतुलन आणि कॅन्सरचा धोका वाढतो.
नॉन-स्टिक भांडी जास्त तापमानावर गरम केल्यास किंवा त्यांचे कोटिंग खरचटल्यास त्यातून विषारी वायू बाहेर पडतात.
स्वयंपाकात एकदा वापरलेले तेल पुन्हा पुन्हा गरम करून तळण्यासाठी वापरल्यास त्यात 'फ्री रॅडिकल्स' आणि घातक संयुगे तयार होतात, जी शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात.
पॅकेज्ड मांस किंवा सॉसेजमध्ये टिकवून ठेवण्यासाठी 'नायट्रेट्स' वापरले जातात, ज्यांचा थेट संबंध आतड्याच्या कॅन्सरशी जोडला गेला आहे.
फरशी पुसण्याचे लिक्विड, ब्लीच आणि टॉयलेट क्लीनर्समध्ये 'फॉर्मल्डिहाइड' आणि 'बेंझिन' यांसारखे बाष्पशील सेंद्रिय संयुगे असतात. श्वासावाटे ही रसायने शरीरात गेल्याने फुफ्फुसांना इजा होऊ शकते.