Anuradha Vipat
बियर हे इतर मद्यांच्या तुलनेत सौम्य वाटत असले तरी, त्यात अल्कोहोल आणि भरपूर कॅलरीज असतात, ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
जर तुम्ही बियर पित असाल, तर सुरक्षिततेसाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी खालील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
रिकाम्या पोटी बियर प्यायल्यास अल्कोहोल वेगाने रक्तात मिसळते आणि लवकर नशा चढते.
बियरमुळे शरीरातील पाणी कमी होते आणि वारंवार लघवीला होते.
मर्यादित मद्यपानामध्ये महिलांसाठी दिवसातून जास्तीत जास्त १ ड्रिंक आणि पुरुषांसाठी २ ड्रिंक्सची मर्यादा सांगितली जाते.
एका तासात एकापेक्षा जास्त ड्रिंक घेऊ नका. शरीराला अल्कोहोल पचवण्यासाठी किमान एक तासाचा वेळ लागतो.
बियरमध्ये 'एम्प्टी कॅलरीज' आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. यामुळे पोटावर चरबी साठून 'बियर बेली' तयार होते आणि लठ्ठपणा वाढतो.