Anuradha Vipat
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हलके, पौष्टिक आणि झटपट तयार होणारे पदार्थ निवडणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
मुरमुरे पचायला हलके असतात. तुम्ही याचा सुका चिवडा किंवा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू घालून 'हेल्दी भेळ' बनवू शकता
मखाणे भाजून त्यात थोडे मीठ आणि मिरपूड घातल्यास तो एक उत्तम लो-कॅलरी नाश्ता ठरतो.
यामध्ये प्रथिने भरपूर असतात, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते .
कमी तेलात बनवलेले पोहे किंवा रव्याचा उपमा संध्याकाळसाठी चांगला पर्याय आहे
ज्वारी, बाजरी आणि बेसनाचे पीठ वापरून बनवलेले भाजणीचे थालीपीठ अत्यंत पौष्टिक असते
मोड आलेल्या कडधान्यांमध्ये कांदा, टोमॅटो आणि चाट मसाला घालून खाल्ल्यास शरीराला भरपूर लोह आणि प्रथिने मिळतात