Bamboo Farming : राज्य सरकारचा शाश्वत शेतीचा राजमार्ग, बांबू लागवड

Aslam Abdul Shanedivan

सरकारकडून उपाय योजना

अवकाळी, गारपीट, दुष्काळासह पडणारे भाव यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यांना शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने राज्य सरकारकडून उपाय योजना आखली जात आहे

Bamboo Farming | agrowon

टास्क फोर्सची घोषणा

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना बांबू लागवडीस प्रोत्साहन दिले जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टास्क फोर्सची घोषणा केली आहे

Bamboo Farming | agrowon

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा समावेश

राज्य सरकारच्या या टास्क फोर्समध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा देखील समावेश असणार आहे. तर यात कालबध्द कार्यक्रमासह अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Bamboo Farming | agrowon

किमान एकदा बैठक

या टास्क फोर्समध्ये विविध अशासकीय संस्था, कंपन्यांच्या प्रतिनिधींना तसेच तज्ज्ञांचाही समावेश असून तीन महिन्यातून किमान एकदा बैठक होणार आहे.

Bamboo Farming | agrowon

बांबू शेती

बांबू शेती व त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना देणे आणि आदिवासी परिसरातील स्थलांतर थांबवणे हा योजनेमागचा खास हेतू आहे.

Bamboo Farming | agrowon

बांबू उपक्रम

बांबू शेती व त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगामुळे स्थानिकांना रोजगार सुरू होऊन अर्थचक्र सुरू होईल. सध्या प्रायोगिक तत्त्वावर नंदुरबार जिल्ह्यात बांबू उपक्रम राबविला जात आहे

Bamboo Farming | agrowon

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी

बांबू हे कमी पाण्यात वाढणारे तर कार्बन शोषून घेणारे पीक आहे. हे विदर्भ व मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्ये दुष्काळ व अवकाळी पाऊस अशा स्थितीत वाढू शकते. त्यामुळे हे येथील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते.

Bamboo Farming | agrowon

Vatana Rate: 'या' बाजारात वाटाणा खातोय भाव!

आणखी पाहा