Anuradha Vipat
महिलांच्या शरीराला विविध टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या पोषक घटकांची गरज असते.
काही महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे महिलांच्या दररोजच्या आहारात असणे गरजेचे आहे.
व्हिटॅमिन D हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे शरीरात कॅल्शियमचे योग्य शोषण होते.
व्हिटॅमिन B12 शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते आणि मज्जासंस्थेचे आरोग्य चांगले ठेवते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन C उपयुक्त ठरते.
हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असून त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
विशेषतः गर्भधारणेचा विचार करणाऱ्या महिलांसाठी फॉलिक अॅसिड खूप महत्त्वाचे आहे.