Anuradha Vipat
फ्लॅट खरेदी करणे हा जीवनातील एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असतो.
वास्तू अनुकूल असलेला फ्लॅट घरामध्ये सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येतो.
फ्लॅटचे मुख्य प्रवेशद्वार उत्तर , पूर्व किंवा ईशान्य दिशेला असणे सर्वोत्तम मानले जाते.
स्वयंपाकघर आग्नेय कोपऱ्यात असणे सर्वात शुभ असते. जर ते शक्य नसेल, तर वायव्य दिशा हा दुसरा उत्तम पर्याय आहे.
मास्टर बेडरूम नेहमी दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात असावी. झोपताना डोके दक्षिण दिशेला आणि पाय उत्तर दिशेला असावेत.
शौचालय किंवा बाथरूम वायव्य किंवा दक्षिण दिशेला असावे. घराच्या मध्यभागी तसेच ईशान्य कोपऱ्यात शौचालय कधीही नसावे.
फ्लॅटचा आकार चौकोनी किंवा आयताकृती असावा. अनियमित आकाराचे किंवा कोपरे कट असलेले फ्लॅट घेणे टाळावे.