Vijayadashami Remedies : विजयादशमीच्या दिवशी घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी काय करावे?

Anuradha Vipat

शुभ मुहूर्त

विजयादशमी म्हणजेच दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो.

Vijayadashami Remedies | agrowon

उपाय

या दिवशी नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात सुख, शांती आणि अखंड समृद्धी आणण्यासाठी धार्मिक शास्त्रानुसार खालील उपाय आवर्जून करावेत.

Vijayadashami Remedies | agrowon

झेंडू आणि आंब्याचे तोरण

सकाळी स्नान उरकल्यानंतर घराचे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ धुवून घ्यावे. दारावर झेंडूची फुले आणि आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे तोरण लावावे.

Vijayadashami Remedies | agrowon

शस्त्र पूजन

घरातील शस्त्रे , मुलांची पुस्तके, लेखणी, व्यावसायिक अवजारे, संगणक आणि वाहनांना हळद-कुंकू, अक्षता आणि झेंडूची फुले वाहून पूजा करावी.

Vijayadashami Remedies | agrowon

शमी आणि अपराजिताची पूजा

घरात सुख-समृद्धी टिकून राहण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी शमीच्या वृक्षाचे पूजन करणे अत्यंत फलदायी मानले जाते.

Vijayadashami Remedies | agrowon

तिन्हीसांजेला दीपदान

सायंकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा देवापाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा.

Vijayadashami Remedies | agrowon

मोठ्यांचे आशीर्वाद आणि 'सोने' वाटावे

सायंकाळी सीमोल्लंघन केल्यानंतर मंदिरातील देवाचे दर्शन घ्यावे. त्यानंतर घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या चरणांवर आपट्याची पाने ठेवून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.

Vijayadashami Remedies | agrowon

Dussehra Special Thali : विजयादशमी स्पेशल नैवेद्य थाळी: 'या' सोप्या पद्धतीने बनवा दसऱ्याचा पारंपारिक बेत!

Dussehra Special Thali | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...